सुंदर विचार



सुंदर विचार कधी हवेत संचारत नसतात तर ते काळ्या भोर जमिनीत नव रूप घेतात.

त्यांची बिया प्रमाणे देहाच्या मातीत अंतःकरणात रुजवण करावी लागते.

नुसत रूजवण करून सोडून देता येत नाही.

सतत त्यांची दखल घेऊन रोपट्यासम त्यांची देखभाल करावी लागते.

ठराविक वेळाने त्यांना खत ( उजळणी ) व पाणी ( निजध्यास) देण आवश्यक असत.

मग त्या सुंदर विचारांच सुंदर झाडात परिवर्तन होत.

अर्थात यासाठी कालावधी हा लागतोच.

ज्या देहात (जमिनीत ) ते वाढतात ते झाड खूपच मनमोहक दिसते त्या झाडावर प्रत्येकाची नजर असते काही झाडाच्या सावलीचा फळाचा उपयोग करून घेतात तर काही देहाला दगडी मारत बसतात .


रोपट्याला जसा उन वारा पावसाचा धोका असतो तसाच सुंदर विचारांना नकारत्मकतेचा धोका असतो.

या सुंदर विचारांनी खरतर आपला मार्ग सुनिश्चित केला जातो पण त्यांच संरक्षण वाईट संगत व वाईट विचारा पांसून लक्षपूर्वक कराव लागत.

अशाप्रकारे काही काळानंतर त्या झाडाला फुले येऊन जसे भरघोस फळे प्राप्त होतात तसेच सुंदर विचारही देहाला समाधान रूपी फळे दयायला चालू करतात.

जसा इवल्याशा बी पासून झाडाचा प्रवास ठरतो तसच सुंदर विचार आपल्या जीवनाचा मार्ग ठरवतात वाईट विचारांच मात्र अस काही होत नाही.

वाईट विचार हे सहज जसे शेतात हरळी लव्हाळा यांच्या बिया न लावताही शेतात उगवतात व मूख्य झाडाच अन्न पाणी खाऊन शेताच नुकसान करतात तसच वाईट विचारांच होत.

वाईट विचार चांगल्या विचारांना मागे पाडतात व स्वतः बरोबर देहाची अधोगतीची दिशा ठरवतात त्यामुळे वेळेत खुरपणी ( उच्चाटन) होणे खूप आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण ठरवायच आहे आपल्याला कुठल पीक आणायच आहे त्यावरून आपल्या आयुष्याची दिशा ठरली जाईल व फळेही आपल्या बरोबर इतरांनाही मिळतील..

सौ निता मोहन खराडे (उगले)

Leave a Comment