गरुड भरारी


गरूड भरारी घ्यायला हवी कितीदा म्हणतो
गरुडाचा कष्टदायी स्वभाव कुठे हो जाणतो !
गरूड भरारी घेण्यासाठी जाणूया गरूडाचा प्रवास
प्रवासातून त्याच्या पेटावा अंतरी आपल्याही ध्यास !
गरुडास लाभे एकूण सत्तर वर्षाचे आयुर्मान
४० व्या वर्षी संपू लागतात गरूडाच्या शरीराचे त्रान !
पंजे होतात लांब अन लवचिक, शिकारीची होते अडचण
चोच पुढे वळते, अन्नाची सुरू वणवण !
पंख होतात जड ,बसतात छातीला चिकटून
जगण्याचे ध्येय संपून, जणू जाते आकाश फाटून !
प्राण त्याग करणे, गिधाडा प्रमाणे जगण , पुनः प्रस्थापित करण जीवनाच्या याच तीन वाटा
पहिल्या दोन वाटा सोडून गरुड भरारीसाठी एकांतात करी आटापिटा !
चोच अन पंजे आपटून तोडी ,स्वतःचेच पंख उपसून स्वतः काढी
नवीन चोच, नवे पंजे, नवे पंख, घेऊन गरूड मारे गरूड भरारीची उडी !
१५० दिवसाच्या अथ्थक परिश्रमातूनच हे शक्य होतं
पशु पक्ष्यां कडून शिकाव मनुष्यान जीवनाविषयीच नातं !
संपलय सार हारून म्हणण्यापेक्षा कराव आत्मपरीक्षण
मूर्ती घडण्यासाठी दगडालाही सोसावे लागतात घन !

अशा हया गरूड पक्ष्याकडून खूप काही शिकाव
आयुष्यात येणाऱ्या संकटापुढ कधी ना झुकाव !
मनुष्याच्याही तीन अवस्थात अशी स्थिती येते
बघता बघता डोळयापुढ नियती खूप काही घेऊन जाते !
हीच ती वेळ असते योग्य रस्ता निवडण्याची
का झाल ? कस झाल ? यापेक्षा ज्ञानदृष्टीन स्वतःला घडण्याची !
गरुडाच्या चोचीसारख जीभेची अमंगळ वाणी सोडून रामनाम जपण्याची
आपल्या इंद्रियांना वळण लावून योग्य दिशेने रस्ता कापण्याची !
गरूड स्वतः जुने पंख उपसतो तसे स्वतःतील अवगुण काढून गुणांना अंतरी भरण्याची
आणि मग वेळ येते नवे पंख नवे चैतन्य घेऊन नवे जग अनुभवण्यासाठी गरूड भरारी मारण्याची !

सौ निता मोहन खराडे (उगले )

Leave a Comment