रूढी व सौभाग्याचं लेण


अतिशय हुशार ,सुंदर, नेतृत्वगुण असणारी नलिनी माझी बालमैत्रिण सगळ्या आम्हा मैत्रिणींच्यात अगदी वेगळी !पण एकेदिवशी तिच्या मिस्टरांचा अचानक ऑक्सिडंट झाला त्या दिवशीचा तिचा चेहरा अजूनही डोळ्यासमोरून जात नाही . या राजा राणीच्या सुंदर घरट्यात दोन छोटी पिल्ले पण या नियतीच्या वादळाने तिच सर्वस्व हिरावून नेल . बाहेरच्या जगाचा तिला फारसा अनुभव नव्हता अन त्यात तिच्यावर आलेला दुःखाचा भयंकर प्रसंग, अजूनही आठवल तरी अंगावर काटा येतो ! हा दुःखाचा डोंगर एकीकडे अन आपल्या काही जाचक रूढी परंपरा त्यात डागण्या देण्यासाठीच जणू केल्या गेल्यात , अस मला त्यादिवशी वाटल.अन्त्यसंस्काराच्या वेळी तिच एकएक सौभाग्याच लेण उतरवण्यात आलं, नेहमीची मस्त टापटीप राहणारी नटण्याची हौस असणारी नलिनी पण रंगहीन दिसू लागली, हे सौभाग्याच लेण जेव्हा स्त्रीकडे असत तेव्हा तेच तर तिच खर सौंदर्य तिच तेज प्रदर्शित करत असतं, पण एका क्षणात तिचा साज या समाजाने रूढींच्या विळख्यात काढून घेतला तेव्हा असंख्य प्रश्नाने माझे कवीमन हेलावून गेले , माझा परंपरेला विरोध नाही परंतु ती वेळ , तिला थोड सावरायला तरी वेळ द्यायला हवा होता ! मग दील असत की तिने स्वतःहून हे सार , या बांगड्या मंगळसूत्र टिकली जोडवी किती भावना जोडल्या गेल्या असतील तिच्या मनातल्या ! पण असो याला विरोध तरी कोण करणार ? तिची मानसिक अवस्था कोण समजून घेणार ?जेव्हा जिवाचा जोडीदारच तिच खर सौभाग्यच नसेल तर सौभाग्याच लेण म्हणजे होतात वस्तू ज्यांना सौभाग्याची खरी किंमत आहे त्या जपतात सौभाग्याच लेण मनापासून कुठल्याही परिस्थितीत ! पण फॅशनच्या नावाखाली काहींना हेच अडाणीपणाच लक्षण वाटत तेव्हा कीव येते त्यांच्या शिक्षणाची , सौभाग्य लेण्याला खेळण म्हणून पाहण्याची….

सौ निता मेहन खराडे (उगले)

Leave a Comment