कल्पना विस्तार लेखन
विषयः जनसेवा हीच ईश्वरसेवा
शास्त्रही मान्यता देतं की ईश्वराने ही सृष्टी निर्माण करताना चार खाणी चार वाणी चौऱ्यांशी लक्ष जीव योनी जीव प्राण्यांची निर्मिती केली .त्यात मनुष्य प्राणी हा विशेष बनवला कारण ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार फक्त मनुष्याला आहे मग प्रश्न पडतो ईश्वराची भक्ती कशी करावी ? सजीव -निर्जीव ,चराचर सृष्टीत ईश्वराच रूप सामावलेल आहे याची जाणीव ठेऊन आपल्याला योग्य मार्गानं भक्ती करता आली पाहिजे .
मनुष्य हा जन्मतः मातृ ऋण ,पितृ ऋण आणि समाज ऋण घेऊन आला आहे मोक्षप्राप्ती साठी ही ऋण ईश्वर भक्तीच्या सहाय्याने त्याला फेडता येण शक्य आहे . प्रत्येक माणसाच्या अंतरी ईश्वराचा अंश या जाणीवेन जनसेवा शक्य त्या परीन करून ईश्वर सेवा करण्याच समाधान प्राप्त होऊ शकतं . ईश्वर सेवेसाठी तास न तास देवपूजा ,तीर्थाटन करण्यापेक्षा प्रत्येकान स्वतःच काम कर्तव्य जबाबदारी पार पाडत समाजाची सेवा जमेल तशी पण निष्कामतेन करावी. ही सेवा फक्त दानधर्म याने करता येते अस नाही तर आपल्याकडे जे आहे ते आर्थिक ,मानसिक बळ आपण इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणू शकतो, इतरांच्या हाकेला धाऊन त्यांना ईश्वराच्या सेवेचा भाग म्हणून ईश्वर भक्तीच पुण्य प्राप्त करू शकतो . संतपरंपरेन त्यांच्या कार्यातून हीच शिकवण दिली “जगाच्या कल्याणा संताच्या विभूती” यासाठी गरज आहे एक पाऊल आपण टाकण्याची ईश्वर हजारो पाऊल आपल्या साठी चालून तयारच आहे एकरूपतेन भक्तीच सामर्थ्य अनुभवायला .
जनसेवेचे मनी बांधूया तोरणं
ईश्वरसेवेच्या संगतीन भक्तीत तरणं…..
निता मोहन खराडे (उगले